MSRTC 7 DAY PASS आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना ७ दिवसांचा एसटी बस चा पास काढा आणि संपूर्ण महाराष्ट्र प्रवास करा

MSRTC 7 DAY PASS : या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक फक्त 1,100/- रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतात.योजनेअंतर्गत 4 दिवसांचा व 7 दिवसांचा पास दिला जातो या पास ची वैधता हि पहिल्या दिवशी रात्रीचे 12 वाजल्यापासून ते शेवट च्या दिवशी (4 आणि 7) दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत असेल.राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरावीत व नागरिकांना एस.टी.मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

MSRTC 7 DAY PASS

आवडेल तेथे प्रवास योजनेचे उद्दिष्ट|MSRTC 7 DAY PASS

  • राज्यातील नागरिकांना कमी खर्चात त्यांना आवडेल तेथे प्रवास उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील नागरिकांना एसटी ने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील नागरिकांना एसटी ने प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे.

आवडेल तेथे प्रवास योजनेचे वैशिष्ट्य|MSRTC 7 DAY PASS

  • या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास 10 दिवस अगोदरपर्यंत देता येईल.
  • आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना चे पास नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये ग्राह्य राहील.

MSRTC Nashik Bharti 2024: महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत  सरकारी नोकरीच्या संधी थेट मुलाखत

आवडेल तेथे प्रवास योजनेचे लाभार्थी

राज्यातील सर्व व्यक्ती आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत पास शुल्क| MSRTC 7 DAY PASS PRICE

MSRTC 7 DAY PASS

आवडेल तेथे प्रवास योजनेचा फायदा

या योजनेच्या सहाय्याने राज्यातील प्रवाशांच्या पैशांची बचत होईल.

पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल.

या योजनेअंतर्गत तुम्ही एसटी च्या सर्व बसेस (साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी),शिवशाही (आसनी)) ने प्रवास करू शकता.

आवडेल तेथे प्रवास योजनेच्या अटी व शर्ती| MSRTC 7 DAY PASS TERM AND CONDITIONS

  1. ज्या व्यक्तीच्या नावे पास काढण्यात आलेला आहे केवळ तीच व्यक्ती या पास चा वापर करून प्रवास करू शकते.
  2. आवडेल तेथे प्रवास ह्या योजना अंतर्गत दिलेल्या पास ची वैधता समाप्त झाली असेल आणि तो पासधारक प्रवास करताना आढळला तर त्याच्याकडून तिकीट आकारलं जाईल.
  3. या योजनेअंतर्गत पासधारक आवडेल त्या आसनासाठी हक्क सांगू शकत नाही. परंतु या योजनेतील पास धारकाना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.
  4. पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही.वा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  5. जर एखादा पासधारक दिलेल्या पास चा गैरवापर करत असेल तर अशा प्रवाशांकडून पास जप्त केला जाईल.
  6. प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही.सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.
  7. आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना 00.00 ते 24.00 अशी करण्यात येईल.पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर 24.00 वा. नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
  8. जर एसटी चा संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन वाहतूक बंद झाली व प्रवासी सदर पासवर प्रवास करू न शकला तर प्रवाशाने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्यापासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.
  9. सदर योजनेत मुलांच्या पासाचे दर 5 वर्षापेक्षा जास्त व 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.
  10. या योजनेअंतर्गत फक्त 7 व 4 दिवसाचे पास दिले जातील.
  11. साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.
  12. या पास ने फक्त एसटी मधूनच प्रवास करता येईल इतर कोणत्या वाहनांमधून या पास चा उपयोग करता येणार नाही.
  13. निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठीआंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील.
  14. या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास 30 किलो व 12 वर्षाखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल.
  15. सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
  16. स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.

आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे|MSRTC 7 DAY PASS IMPORTANT DOCUMENTS

  • आधारकार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत| MSRTC 7 DAY PASS ONLINE APPLY

  1. अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील नजीकच्या राज्य परिवहन बस स्टॅण्डमध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  2. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून पैसे भरून पास घ्यावा लागेल.

अधिकृत संकेतस्थळ- https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/90

टोल फ्री क्रमांक- 022-23024068 1800221250

 

Leave a Comment