Arogya Vibhag  Bharti 2025 सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागात डॉक्टरांची 1,522 पदे रिक्त! 

Arogya Vibhag  Bharti 2025: सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील आरोग्यसेवा संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आणि द्वितीय आरोग्यसेवा क्षेत्रात डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी संवर्गाची कमतरता आहे. राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची 3 हजार 642 पदे मंजूर असून, त्यापैकी 2 हजार 120 पदे भरली आहेत. तब्बल 1 हजार 522 तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. राज्याच्या लेखापरीक्षणात (कॅग) ही बाब निदर्शनास आली आहे. तज्ज्ञांच्या अभावामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहेत. नवनिर्वाचित वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्ष देऊन रिक्त जागांवर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Arogya Vibhag  Bharti 2025

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत डॉक्टर 37 टक्के, परिचारिका 35 टक्के आणि निमवैद्यकीय कर्मचारी यांची 44 टक्के पदांची कमतरता आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत डॉक्टर 27 टक्के, परिचारिका 35 टक्के व निमवैद्यकीय कर्मचारी 31 टक्के कमतरता आहे. लेखापरीक्षणात मनुष्यबळातील कमतरतेमध्ये प्रादेशिक विषमतादेखील निदर्शनास आली आहे. तसेच डॉक्टर मानकांनुसार तपासावयाच्या किमान रुग्णसंख्येत दुप्पट रुग्ण तपासले आहेत.

Arogya Vibhag  Bharti 2025 Overview

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी

पदसंख्या – 639 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेत 245 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!

Arogya Vibhag  Bharti 2025|arogya.maharashtra.gov.in

भुदरगड तालुक्याच्या आरोग्य विभागात ४१ टक्के जागा रिक्त असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा ढासळली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेला योग्य सेवा देण्यात अडचणी येत आहेत. तेव्हा आरोग्य विभागाने ही रिक्त पदे भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. गरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायी, विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. भुदरगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम व डोंगराळ असल्याने या तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गारगोटी येथे ग्रामीण रुग्णालय, मिणचे भुदरगड तालुक्याच्या आरोग्य विभागात ४१ टक्के जागा रिक्त असून उर्वरित ५९ टक्के कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. रिक्त जागांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. डॉ. ए. वाय. वर्धन तालुका वैद्यकीय अधिकारी, पं. स. भुदरगड खुर्द, पिंपळगाव, कडगाव, पाटगाव मडिलगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे, बारवे येथे आयुर्वेदिक दवाखाना, तर वेसर्डे येथे तालुका दवाखाना आहे. या सर्व आरोग्य केंद्रांचा विचार करता रिक्त संख्या खूप मोठी आहे. वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे १३ आहेत. पैकी तालुक्यातील रिक्त पदे वैद्यकीय अधिकारी ३ आरोग्य परिचर आरोग्य सेविका आरोग्य सहायक १ आरोग्य सहायिका औषध निर्माता अशी तीन पदे रिक्त आहेत. अनेक गावांत आरोग्य सेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची ३६ पदे मंजूर असून, १८ पदे रिक्त आहेत.

Arogya Vibhag  Bharti 2025

भुदरगड तालुका दुर्गम असून, या तालुक्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशिवाय इतर परिपूर्ण व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी १२५ किलोमीटर प्रवास करून जावे लागते. या अंतरात अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावले आहेत. यात भर म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत नियमानुसार असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ४१ टक्के पदे रिक्त आहेत. उर्वरित जी पदे भरली आहेत, त्यातीलसुद्धा २५ टक्के कंत्राटी आहेत. यामुळे एक कर्मचारी ३ कर्मचाऱ्यांचे काम करत असून, याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होतो. तालुक्याचा विस्तार पाहता आताच्या नियमानुसार | असणाऱ्या पदांच्या दीडपट पदांची आवश्यकता आहे. तरीही शासनाने कमान आहे ती नियमित पदे भरली तरी रुग्णसेवा सुरळीत होईल, जेणेकरून पूर्व प्राथमिक व प्राथमिक उपचार रुग्णांना वेळेवर मिळतील. -रवी देसाई, संवाद संस्था, भुदरगड मंजूर असून, १२ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायक १ पद रिक्त आहे. आरोग्य सहायिका ८ पदे मंजूर असून, ५ पदे रिक्त आहेत. पाटगावसारख्या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात गेले कित्येक महिने औषध निर्माता नसल्याने या भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी कमतरतेमुळे अनेक आरोग्य केंद्रांत ‘ओपीडी’ बंद असते.

ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभित इमारती उभा केल्या आहेत; पण त्यात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच वानवा आहे. याला सरकारची उदासीनता व इच्छाशक्तीचा अभाव आहे. शासनाने आरोग्य विभागातील रिक्त जागा भरून जनतेची गैरसोय थांबवावी व सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करावी.

अधिकृत वेबसाईट- http://arogya.maharashtra.gov.in/

ऑनलाईन अर्ज लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html

PDF जाहिरात- https://drive.google.com/file/d/1CmFxjAtjXcJUoSh949yBwdLFdSlKgAq3/view?usp=sharing

Leave a Comment