Railways Recruitment 2025 : भारतीय रेल्वेद्वारे रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 7 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Railways Recruitment 2025
Railways Recruitment : भारतीय रेल्वेद्वारे रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 7 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु? Railways Recruitment 2025
पदव्युत्तर शिक्षक (PGT शिक्षक): 187 पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT शिक्षक): 338 पदे
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): 03 पदे
मुख्य विधी सहाय्यक: 54 पदे
सरकारी वकील: 20 पदे
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (PTI) – इंग्रजी माध्यम: 18 पदे
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण: 02 पदे
कनिष्ठ अनुवादक हिंदी: 130 पदे
वरिष्ठ प्रचार निरीक्षक: 03 पदे
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: 59 पदे
ग्रंथपाल: 10 पदे
संगीत शिक्षक (महिला): 03 पदे
प्राथमिक रेल्वे शिक्षक: 188 पदे
सहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा): 02 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: 07 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): 12 पदे
Railways Recruitment 2025 Educational Qualification
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार 12 वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. अध्यापन पदांसाठी उमेदवाराने B.Ed/D.El.Ed/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदानुसार उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 33 ते 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.
Railways Recruitment 2025 Online Form Fee
उमेदवारांनी अर्जासोबत श्रेणीनिहाय शुल्क जमा करणे आवश्यक आहे. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. रेल्वेतील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर भरती 6 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळं सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावेत
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी
दरम्यान, रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वेने सुरु केलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकची माहिती हवी असेल तर रेल्वेच्या बेवसाईटवर तुम्हाला सविस्तर माहिती पाहता येणार आहे. या बेवसाईटवर जागांच्या संदर्भातील सगळे तपशील दिले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ- https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281