SBI Clerk Recruitment 2025: SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

SBI Clerk Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही नामी संधी असून बंपर भरतीसाठी लगेचच अर्ज करायला हवा.

सरकारी नोकरीसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते. सरकारी नोकरी (JOB) मिळाली की लग्नासाठी छोकरी देखील मिळते, असे जुने-जाणते नेहमीच सांगतात. मात्र, गेल्या काही वर्षात सरकारी नोकरीचे वाढलले महत्त्व लक्षात घेता सरकारी नोकरीमध्ये स्पर्धा देखील मोठी वाढली आहे. त्यामुळे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नोकरी मिळवणे हे आव्हान आहे. त्यातच, सरकारी कार्यलयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असल्याने सरकारी नोकऱ्यांची संख्याही कमी झाले आहे. त्यामुळेच, 4 हजार तलाठी पदासांठीच्या नोकरीसाठी तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त उमदेवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही सातत्याने उमेदवार नोकरीच्या शोधात असतात. नोकरीच्या शोधात असलेल्या या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क (लिपिक) पदासाठी तब्बल 13,735 पदांची भरती निघाली आहे.

SBI Clerk Recruitment 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही नामी संधी असून बंपर भरतीसाठी लगेचच अर्ज करायला हवा. एसबीआयमध्ये ज्युनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) च्या पदांसाठी ही भरती निघाली असून उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन sbi.co.in उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, नोंदणी प्रक्रिया बुधवार 17 डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर, 7 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

फक्त काही मिनिटांत मिळवा ₹50,000 पर्यंत बिनव्याजी कर्ज!

अचानक पैशांची गरज आहे? काळजी करू नका!

आता तुमच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण करा.

लिंकवर क्लिक करा

https://bitli.in/n6ffyWX

SBI Clerk Recruitment 2025 Application Last Date

  • अर्ज भरण्यासाठी सुरुवात – 17 दिसंबर 2024
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 7 जनवरी 2025
  • प्रिलियम परीक्षा तारीख– अंदाजे फरवरी 2025
  • मुख्य परीक्षेची तारीख– अंदाजे मार्च/अप्रैल 2025

SBI Clerk Recruitment 2025 Education Qualification

एसबीआयमधील या पदांसाठी उमेदवारांकडे कुठल्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इंटीग्रेटेड डूअल डिग्री (आईडीडी) सर्टिफिकेट वाल्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 च्या अगोदर आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

Ladki Bahin Yojana Update : ठरलं! या तारखेला महिलांना मिळणार 2100 रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती

SBI Clerk Recruitment 2025 Age Limit

उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 च्या अगोदर आणि 1 एप्रिल 2004 च्या नंतर झालेला नसावा.

SBI Clerk Recruitment 2025 Application Form Fee

या क्लर्क पदासाठी सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना परीक्षा शुल्क 750 रुपये भरावे लागणार आहे. तर, एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना शुल्कात सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना शुल् भरताना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगचा वापर करावा लागेल.

दरम्यान, अधिक माहितीसाठी उमेदवार एसबीआयच्या

अधिकृत वेबसाइट – sbi.co.in

वर जाऊन भेट देऊ शकतात.

Leave a Comment