Malegaon MahanagarPalika Recruitment: चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मालेगाव महानगरपालिकेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
मालेगाव महानगरपालिकेत समुदाय समन्वयक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथील मालेगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
Malegaon MahanagarPalika Recruitment
- पदाचे नाव : समुदाय समन्वयक
- एकूण रिक्त पदे : 33 पदे.
- नोकरीचे ठिकाण : मालेगाव, नाशिक.
- शैक्षणिक पात्रता : दहावी पास.
- वयोमर्यादा : 21-45 वर्ष.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2024.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
- या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://malegaoncorporation.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.