आता सरकार देखील स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी एक योजना राबवत आहे. त्या योजनेचे नाव आहे ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज देते. चला तर आज जाणून घेऊया मुद्रा योजनेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा, कोणत्या बॅंकेत ही सुविधा उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
या अंतर्गत लोकांना कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज घेऊ शकता. ही योजना खास तरुणांसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेची सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमच्याकडून कर्जावर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. योजनेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुद्रा कार्ड मिळते. डेबिट कार्डप्रमाणेच तुम्ही हे मुद्रा कार्ड वापरू शकता.
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही नॉन-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 सुरू केलेली योजना आहे. कर्जे PMMY अंतर्गत MUDRA कर्ज म्हणून वर्गीकृत केलेले आहे. हे कर्ज व्यावसायिक बँका, RRB, लघु वित्त बँक, सहकारी बँका, MFI आणि NBFC द्वारे प्रदान केले जातात. कर्जदार वर नमूद केलेल्या कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधू शकतात. या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. PMMY च्या मदतीने, MUDRA ने लाभार्थी सूक्ष्म युनिट्स/उद्योजकांच्या प्रगती/विकास आणि निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तीन उत्पादनात ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ विकसित केली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- आता तुमच्या समोर होम पेज उघडेल.
- तुम्हाला मुद्रा योजनेचे प्रकार मुख्यपृष्ठावर दिसतील जे खालीलप्रमाणे आहेत.
- शिशु
- युवा
- तरुण
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पृष्ठावरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला या अर्जाची प्रिंट आउट घ्यावी लागेल.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
- तुम्हाला यानंतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील.
- आता तुम्हाला हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करावा लागेल.
- 1 महिन्याच्या आत तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना- ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेबद्दल जाणून घ्या कि ती मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सूचीबद्ध आहे.
तुम्हाला बँक निवडल्यानंतर तुमच्या व्यवसायची योजना बनवावी लागेल.
बिझनेस प्लॅनमध्ये, तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही बिझनेस लोन म्हणून मिळालेली रक्कम कशी वापराल.
जेव्हा व्यवसाय योजना तयार होईल, तेव्हा तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल आणि तो योग्यरित्या भरावा लागेल.
सबमिशनच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे फॉर्ममध्ये तपासा. सर्व संबंधित कागदपत्रे तयार ठेवा.
मुद्रा कर्जासाठी मुद्रा फॉर्म भरल्यानंतर, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, ताळेबंद, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), आयकर विवरणपत्र, विक्रीकर इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.
जेव्हा फॉर्म पूर्णपणे भरला जातो आणि सर्व कागदपत्रे जोडली जातात, तेव्हा आता ते पुन्हा एकदा तपासणे आवश्यक आहे. फॉर्म पुन्हा तपासा.
तुम्हाला खात्री असेल की, फॉर्ममध्ये कोणतीही दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, तेव्हा तो बँकेत जमा करा.
आता बँक फॉर्मची पडताळणी करेल आणि पुढील चरणासाठी तुम्हाला सूचित करेल.