Jamin Kayada Maharashtra आता 1 गुंठा शेतजमिनीची देखील खरेदी-विक्री करण्यास शासनाची परवानगी,जाणून घ्या सविस्तर संपूर्ण प्रक्रिया!

  1. Jamin Kayada Maharashtra आता 1 गुंठा शेतजमिनीची देखील खरेदी-विक्री करण्यास शासनाची परवानगी,जाणून घ्या सविस्तर संपूर्ण प्रक्रिया!

Jamin Kayada Maharashtra: महाराष्ट्र राज्यात शेतजमीन अधिनियम नुसार जमिनीचे तुकडे करून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.अर्थातच संपूर्ण राज्यात तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Jamin Kayada Maharashtra

महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या जमीन तुकडेबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना १० गुंठ्यापेक्षा कमी बागायती जमीन आणि २० गुंठ्यापेक्षा कमी जिरायती जमीन खरेदी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Bajaj Finance personal loan बजाज फायनान्सच्या पर्सनल लोनद्वारे तुमच्या तातडीच्या खर्चाचे व्यवस्थापन करा apply now

सदर क्षेत्रापेक्षा कमी आकाराची जमीन खरेदी विक्री करावयाची असल्यास संबंधित प्रांताधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते.त्यांनी परवानगी दिली तरच शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करता येतात.

परिणामी शेतकऱ्यांना विहीर,शेतात जाण्यासाठी रस्ता,घरकुल यांसारख्या गोष्टी शेतात बांधायच्या झाल्यास त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.यावर उपाय म्हणून राज्य सरकारने एक तोडगा काढला आहे.

ज्या शेतकऱ्यांना विहीर,शेतरस्ता आणि घरकुल यासाठी जमिनीची खरेदी विक्री करायची झाल्यास अशा शेतकऱ्यांना १ गुंठ्यापासून ते ५ गुंठ्यांपर्यंत शेतजमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाने तुकडेबंदी कायद्यात तरतूद केली आहे.

यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांना विहीर,शेतरस्ता आणि घरकुल यासाठी १ ते ५ गुंठे शेतजमीन खरेदी विक्री करण्यासाठीचे अधिकार देण्यात आले आहेत.संबंधित शेतकऱ्यांना त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना घरकुल,शेतरस्ता आणि विहीर यासाठी एक गुंठा ते पाच गुंठे जमीन हस्तांतरित करता येणार आहे.

Jamin Kayada Maharashtra

यासाठी महसूल आणि वन विभागाने एक अर्जाचा नमुना देखील जारी केला आहे.त्यामध्ये जमीन खरेदी विक्री करणाऱ्याचे नाव,गाव,जमिनीचा गट नंबर आदी बाबींचा उल्लेख करावा लागणार आहे.

जर शेतकऱ्याला विहिरीसाठी जमीन खरेदी विक्री करायची असेल तर पाच गुंठ्यापर्यंत मर्यादा असणार आहे.आणि घरकुलासाठी खरेदी विक्री करायची झाल्यास एक हजार चौरस फूट इतकी मर्यादा ठेवण्यात आली आहे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला घरकुल किंवा विहिरीचे अथवा रस्त्याचे काम करायचे असल्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्याच्या नंतर एक वर्षाच्या आत संबंधित कामासाठी वापर केला नाहीत तर परवानगी रद्द केली जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://wwwthejobwalaa.in या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

 

Leave a Comment