Anganwadi Bharti 2025 Maharashtra महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025 पात्रता – 12वी उत्तीर्ण | सर्व जिल्हा जाहिराती येथे उपलब्ध

Anganwadi Bharti 2025 Maharashtra : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्रपुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त असणारी पदे, भरली बद्दलची आवश्यक माहिती, pdf सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Anganwadi Bharti 2025 Maharashtra

Anganwadi Bharti 2025 Maharashtra

  • भरती विभाग : महिला व बालविकास विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
  • भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
  • भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन – महिला व बालविकास विभाग) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती होत आहे.
  • पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस.
  • शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.) अधिकृत जाहिराती, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
  • अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल 40 वर्ष).

Sarkari nokari 2025 सरकारी नोकरी :प्रयोगशाळा सहाय्यक वेतन : 29,200 ते 92,300 रूपये | शैक्षणिक पात्रता :12वी / पदवीधर व इतर पात्रता.

Anganwadi Bharti 2025 Maharashtra

अर्ज सुरु : फेब्रुवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

ज्या नगर परिषद / नगर पंचायत / नगर पालिका / नगरपरिषद / ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे. त्या नगरपरिषद/ नगरपंचायत /नगरपालिका / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहीवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. स्थानिक रहिवाशी असले बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडने आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे 80 गुण (१२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, डी एड, बी एड व शासकिय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवीलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र यांचे एकत्रीत कमाल 80 गुण) व अतिरिक्त 20 गुण (विधवा/अनाथ -10 गुण, अनुसुचित जाती जमाती-05 गुण, इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती /भटक्या जमाती /आर्थिक दृष्ट्या दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणीक दृष्या मागास प्रवर्ग 03 गुण, अंगणवाडी सेविका / मिनी सेविका। मदतनिस पदाचा 02 वर्षाचा अनुभव असल्यास 05 गुण.

महत्वाच्या अटी व शर्ती :

1) शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी सेविका आणि मदतनिस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)

2) वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी, स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील (नगरपालिका /नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील) रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवाशी दाखला म्हणुन शासकिय दस्तऐवज (जसे: आधारकार्ड /मतदान ओळखपत्र तहसिलदार/वार्ड अधिकारी यांचा रहीवाशी दाखला इ.) जोडणे आवश्यक आहे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)

3) वयाची अट व पुरावा अंगणवाडी सेविका, मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे राहिल. तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहिल. वयाचा पुरवा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला /१० वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील, उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास गणण्यात येईल. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)
4) लहान कुटुंब :- लहान कुटुंबाकरीता दि.२७/०२/२०२४ चा शासन निर्णय लागू राहील वरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागु राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबा बाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल,

5) मराठी भाषेचे ज्ञान मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.

6) उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र जोडावे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)

7) उमेदवार अनाथ असल्यास जोडावे. संबंधित विभागीय उप-आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे कडील प्रमाणपत्र. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

8) मागासवर्गीय असल्यास अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती / इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती आर्थिक दृष्टया दुर्बल घटका विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

अधिक माहिती साठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन kara
येथे दाबा-https://chat.whatsapp.com/In8VvSA9zeTJd7vv85PfzT

Leave a Comment