Gharkul Yojna List जमीन नसलेल्या लाभार्थींना प्राधान्याने मिळणार घरकुल योजनेचा लाभ घरकुल योजनेची यादी लावण्याचे मंत्र्याचे निर्देश

Gharkul Yojna List बऱ्याच वेळेस घरकुल योजनेचा लाभ मिळतो परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. अशावेळी आपण घरकुल योजनेपासून वंचित राहतो कि काय अशी शंका मनात निर्माण होते.

परंतु आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण तुमचे नाव जर घरकुल यादीत आले असेल आणि तुम्हाला घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर शासनाकडून तुम्हाला जागा मिळणार आहे.

केवळ जागाच नव्हे तर ज्या पात्र अर्जदारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल अशा अर्जदारांना घरकुल देतांना प्राधान्यक्रम देखील दिला जाणार आहे.

या संदर्भातील निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबधित अधिकारी यांनी काल दिनांक २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत.

Gharkul yojna list

 

Gharkul Yojna List मंजूर घरकुलांची यादी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लागणार

अनेकदा आपले नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे किंवा नाही या संदर्भात लाभार्थीला संभ्रम निर्माण होतो. अशावेळी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागामध्ये आता यापुढे घरकुल योजनेच्या मंजूर याद्या लागणार आहे.

लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करतांना अनुदान रकमेचा हफ्ता वेळेवर मिळेल जेणे करून घरकुल योजना अंतर्गत घराचे काम लवकरात लवकर होईल.

Gharkul Yojna List 20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट

प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला हक्काचे स्वताचे घर असावे. हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत.

या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे.

बऱ्याच वेळेस होते असे कि लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ठ दर्जाचे काम केले जाते. मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबधित अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.

Farmer Id फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती

काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेच्या अनुदानाचा हफ्ता मिळविण्यासाठी लाभार्थीकडून लाच मागण्याची शक्यता असते. अशावेळी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास पैसे न देता रीतसर तक्रार केल्यास लाभार्थीचे होणारे आर्थिक शोषण थांबू शकते.

तर अशा पद्धतीने ज्या पात्र लाभार्ठींकडे घरबांधकाम करण्यासाठी जागा नाही त्यांना आता प्राधान्याने योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

यामुळे ज्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नाही अशा पात्र लाभार्थीसाठी नक्कीच हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

 

अधिक माहिती साठी Official Website

https://pmaymis.gov.in/

 

 

 

Leave a Comment