Lek Ladki Yojana In Maharashtra: काय आहे लेक लाडकी योजना?मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! शिक्षणात प्रगती करण्यासाठी मुलींना होणार मदत

Lek Ladki Yojana in Maharashtra: गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या..!

राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

Lek Ladki Yojana in Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे. राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. या अनुषंगाने या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे लेक लाडकी योजना? Lek Ladki Yojana in Maharashtra

मुलींचा जन्मदर वाढवणे व शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार असून कुटुंबामध्ये जर एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून जी मुलगी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आहे त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.

जर आपण या योजनेच्या माध्यमातून मुलीला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे स्वरूप पाहिले तर मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पहिली मध्ये जाईल तेव्हा 6000 रुपये, सहावीत मुलगी गेल्यानंतर सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच एकूण मुलीला एक लाख एक हजार रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.

शासन मुलींना देणार एक लाख एक हजार रुपये –Lek Ladki Yojana in Maharashtra

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • याकरिता लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
  • लाभार्थी मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत
  • मतदान ओळखपत्र( मुलगी जेव्हा शेवटचा लाभाकरिता म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिचे मतदार यादीत नाव आवश्यक)
  • तसेच या टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी Lek Ladki Yojana in Maharashtra

योजना प्रामुख्याने एक एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहिला. पहिल्या हपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार असून सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी’ मुलगी अविवाहित अन् शाळेत असण्याचे बंधन; १८ वर्षानंतर ७५ हजार रुपये Lek Ladki Yojana in Maharashtra

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारतर्फे ‘लेक लाडकी’ ही योजना राबविली जाणार असून त्याचा शासन निर्णय मंगळवारी निघाला. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर तिच्या नावे विशिष्ट रक्कम ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील. सोलापूर जिल्ह्यातील १३ हजार मुलांना पहिल्या टप्प्यातील लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana New Update today: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! आता घरकूल योजनेचाही लाभ मिळणार, तब्बल ‘इतकी’ घरं मंजूर

योजनेचे अर्ज ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्यसेविकांकडून त्या अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी तथा तपासणी होईल. नागरी व ग्रामीण भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलांच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना द्यावी. प्रत्येक लाभार्थीची नोंदणी ऑनलाइन करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकांवर असणार आहे.

Lek Ladki Yojana in Maharashtra योजनेची उद्दिष्टे…..

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे

■ मुलींच्या शिक्षणास चालना देणे

■ मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह करणे

■ कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे

 योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे…Lek Ladki Yojana in Maharashtra

■ लाभार्थी मुलीचा जन्म दाखला

■ वार्षिक उत्पन्न एक लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला

■ लाभार्थी व पालकाचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट)

■ राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड

■ मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत बंधनकारक)

■ लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड)

■ माता किंवा पित्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र

■ अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा (अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र बंधनकारक )

योजनेच्या अटी व शर्ती….Lek Ladki Yojana in Maharashtra

■ पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्या मुलीला मिळेल लाभ.

■ पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक.

■ दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल. पण, त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य.

■ १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही मिळेल लाभ.

■ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलींना मिळणार लाख रुपये; नेमकी योजना काय अन् कोण पात्र? Lek Ladki Yojana in Maharashtra

राज्य सरकारनं मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मुलींना अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये निधी दिला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारनं ‘लेक लाडकी’ ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडं पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका आहेत अशा कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन अपत्य असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. जर एखाद्या कुटुंबात पहिला मुलगा असेल आणि नंतर दोन जुळ्या मुली झाल्या तरीसुद्धा त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

Lek Ladki Yojana in Maharashtra

टप्प्याटप्प्यानं निधी देणार : मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे तीन हजार रुपये, मुलगी शाळेत गेल्यानंतर तीन हजार रुपये, मुलगी पाचवीत गेल्यानंतर सहा हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत शासनाच्या वतीनं तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. यामुळं पालकांच्या डोक्यावरील मुलींचा शिक्षणाचा भार तसेच त्यांच्या पालनपोषणाचा भार कमी होणार आहे. त्यामुळं मुलगी ही आता जड वाटणार नसल्यानं मुलींचा मृत्यूदर निश्चितच कमी होईल. मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीनं चांगली पावलं उचलली जातील. तसेच महिला सक्षमीकरण यानिमित्तानं होईल, असा दावाही तटकरे यांनी केलाय.

अधिक माहिती साठी WhatsApp Group Join करा- येथे दाबा

Leave a Comment