Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेत 245 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक” पदाची 245 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. ऑनलाइन नोंदणी 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. नागपूर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी एक्साम पॅटर्न व अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा

 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Overview

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक
  • पदसंख्या – 245 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क
  • अराखीव रुपये – १०००/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दर्बल घटक / अनाथ रुपये – ९००/-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 18 – 43 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईटwww.nmcnagpur.gov.in

India Post Payments Bank Bharti 2025 भारतीय पोस्ट बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 35 हजार

NMC Nagpur Vacancy 2025|Nagpur Mahanagarpalika Bharti 2025









पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 36
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 03
नर्स परीचारीका (जी.एन.एम) 52
वृक्ष अधिकारी 04
स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक 150


Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.Ε)

पदाचे नाव-  कनिष्ठ अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापिठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनीक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E)

पदाचे नाव-  नर्स परीचारीका (जी.एन.एम)

शैक्षणिक पात्रता- एचएसएससी नंतर जी.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण (ट्रेड नर्स) व नर्सिंग कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन

पदाचे नाव- वृक्ष अधिकारी

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परिक्षा उत्तीर्ण.

पदाचे नाव- स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी

Age Limit Required Under Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

वयोमर्यादा :-

१ सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातीलन उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

२ सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान १८ वर्ष असावे व कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

३ एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकतम सवलत अनुज्ञेय राहील.

४ सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय शुध्दीपत्रक क्र. निवक-१०१०/प्र.क्र.०८/२०१०/१६-अ, दि.०६/१०/२०१० अन्वये स्वातंत्र सैनिकांचे पाल्य यांचे करिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.

How To Apply For Nagpur Mahanagarpalika Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
  • ऑनलाइन नोंदणी 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दतः- How To Apply Online For NMC Nagpur Engineer Bharti 2024

नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन खाते (User Registration) उघडणे.

२ विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.

३ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

४ प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहील.

 



India Post Payments Bank Bharti 2025

Leave a Comment